संजय राऊत यांच्या हस्ते दैनिक सामना दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन

दैनिक सामना दिनदर्शिका 2026 चे प्रकाशन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार, तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.

दैनिक सामना दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दिनदर्शिका तयार करते. यावर्षी राष्ट्रमाता-जिजाऊंचे माहेरघर सिंदखडेराजा-मातृतिर्थ सिंदखेडराजा हा विषय घेऊन 2026ची-दिनदर्शिका तयार करण्यात आली असून या दिनदर्शिकामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व सिंदखेडराडा संबंधित सर्व माहिती फोटोंसह देण्यात आली आहे. सदर दिनदर्शिका संकल्पना सामनाचे बुलढाना जिल्ह्याचे प्रतिनिधी राजेश देशमाने यांची आहे. दिनदर्शिकेचे प्रकाशन आज (23 डिसेंबर 2025) मुंबईतील सामना कार्यालयामध्ये करण्यात आले. यावेळी नॅशनल हेड (मार्केट डेव्हलपमेंट) दिपक शिंदे, जिल्हा प्रतिनिधी राजेश देशमाने, डॉ. शंभुराजे देशमाने उपस्थित होते.