Photo – शिवसेनाप्रमुखांना अभिवादन अन् युतीची घोषणा

आजच्या मराठी माणसाच्या युतीच्या ऐतिहासिक दिवसानिमित्त शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथील स्मारकावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे, युवासेनाप्रमुख शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना आणि मनसेचे नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक-मनसैनिक उपस्थित होते.