
सिंधुदुर्ग जिह्यातील 26 जून 2021 रोजी झालेल्या ओबीसी आंदोलन प्रकरणात कुडाळ न्यायालयाने बुधवारी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. तसेच सन 2023 मध्ये आचारसंहितेत संविधान बचाव रॅली काढल्याप्रकरणी भाजपचे आमदार प्रवीण दरेकर तसेच आमदार प्रसाद लाड यांनाही कुडाळ येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी जी. ए. कुलकर्णी यांनी अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्याचे आदेश दिले आहेत.
सुनावणीदरम्यान वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने ही कारवाई केली. ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कायदा व सुव्यवस्था भंग झाल्याचा आरोप राणे यांच्यावर करण्यात आला होता. या गुह्यात नीलेश राणे, राजन तेली यांच्यासह 42 जणांवर या प्रकरणी दोषारोप ठेवण्यात आले होते.





























































