
व्हिटॅमीन डीची कमतरता कमी करण्यासाठी सकाळी कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसणे. ते शक्य नसल्यास आहारातील अनेक घटक ही कमतरता दूर करू शकतात. ऑयस्टर मशरूम किंवा उन्हात वाळवलेले शीताके यात भरपूर व्हिटॅमीन डी असते.
आहारात देशी तुपाचा समावेश करावा. तसेच कोवळ्या उन्हात बसण्यापूर्वी थंड प्रेस केलेले तिळाचे तेल लावावे. याशिवाय आहारात काही प्रमाणात फॅट असावे तसेच सकाळी उपाशीपोटी जास्त चहा आणि कॉफी पिणे टाळावे.


























































