
सीरियामध्ये शुक्रवारी नमाज दरम्यान एका मशिदीत झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या स्फोटात अठरा जण जखमी झाले आहेत. ही मशीद अलावाइट भागात आहे. एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, इमाम अली बिन अबी तालिब मशिदीत हा स्फोट झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्फोटानंतर पोलिसांनी परिसरात तपास सुरू केला आहे. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सीरियाच्या गृह मंत्रालयाने या दुर्घटनेला दहशतवादी घटना असल्याचे म्हटले आहे. स्फोटानंतर, स्थानिक माध्यमांनी सांगितले की, सुरक्षा पथके घटनास्थळी पोहोचताच मशिदीला वेढा घातला गेला. या हल्ल्यामागे कोण आहे हे शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.





























































