अरुण गवळीच्या दोन्ही मुली निवडणूक रिंगणात

अरुण गवळी यांच्या दोन्ही कन्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. अखिल भारतीय सेनेकडून गीता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 212 आणि योगिता गवळी यांनी प्रभाग क्रमांक 207 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. गीता या 2017 च्या निवडणुकीत निवडून आल्या होत्या तर योगिता या प्रथमच निवडणूक लढत आहेत. वडील अरुण गवळी यांच्या उपस्थितीत दोघींनी निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल केले.