
उत्तराखंडमधील हर्षिल गावात झालेल्या ढगफुटीनंतर बेपत्ता झालेल्या अग्नीवीर जवानाचा मृतदेह चार महिन्यांनी सापडला आहे. सचिन पोनिया (२३) असे त्या जवानाचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील हाथरसचा होता.
उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली येथे ऑगस्ट महिन्यात ढगफुटीझाली होती. अतिवृष्टी आणि भूस्खलनामुळे डोंगरातून दगड, माती, चिखलासह आलेल्या लोंढय़ामुळे अख्खे गाव वाहून गेले. 10 जवानांसह 50 हून अधिक बेपत्ता झाले होते.. अवघ्या 34 सेकंदांत अनेक घरे आणि हॉटेल्स ढिगाऱ्याखाली गाडली गेली.

























































