कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला अजित पवार गटाकडून उमेदवारी

पुण्यातील कुख्यात व सध्या तुरुंगात असलेला गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. जयश्री मारणे या प्रभाग क्रमांक 10 मधुन उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

गुंडांना व गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिली जात असल्याने त्यावरून सध्या अजित पवार गटावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.