
नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रेडिएशन ऑन्कोलॉजी विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. कास्तव तलपात्रा यांची ‘अमेरिकन सोसायटी फॉर रेडिएशन ऑन्कोलॉजी’चे आंतरराष्ट्रीय राजदूत म्हणून निवड झाली आहे. हिंदुस्थानातून निवडल्या गेलेल्या पहिल्या काही राजदूतांपैकी डॉ. तलपात्रा एक आहेत. प्रगत आणि पुराव्यावर आधारित कर्करोग उपचारांमध्ये डॉ. तलपात्रा निष्णात आहेत. डॉ. तलपात्रा यांनी गेल्या दशकात कर्करोग उपचारांचे जागतिक निकष हिंदुस्थानात आणण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.


























































