
भाजपच्या पावलावर पाऊल ठेवत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, खासदार-आमदारांच्या कुटुंबीयांना तिकीट वाटपदे यांनीही महापालिका निवडणुकीत त्यांच्या गटातील खासदार-आमदारांच्या कुटुंबीयांवर उमेदवारीची खैरात केली आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्याचा फटका शिंदे गटातील घराणेशाहीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, खासदार-आमदारांच्या कुटुंबीयांना तिकीट वाटप गटाच्या उमेदवारांना निवडणुकीत बसणार आहे.
शिंदे गटाचे कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांना प्रभाग क्रमांक 169 मधून तिकीट मिळाले आहे. चांदिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे यांच्या पत्नी शैला यांना प्रभाग क्रमांक 163 मधून चेंबूरचे आमदार तुकाराम काते यांनी आपल्या घरात तन्वी काते आणि समृद्धी काते या दोघींना उमेदवारी मिळवली आहे. भांडुपचे आमदार अशोक पाटील यांचा मुलगा प्रशांत पाटील यांना प्रभाग क्रमांक 113 मधून तिकीट मिळाले आहे. खासदार रवींद्र वायकर यांची कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांना प्रभाग क्रमांक 73 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी खासदार राहुल शेवाळे यांची भावजय वैशाली नयन शेवाळे यांना प्रभाग क्रमांक 183 मधून, माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया यांना अनुक्रमे 194 आणि 191 मधून उमेदवारी देण्यात आली आहे.
शिंदे गटाने भायखळ्याच्या माजी आमदार यामिनी जाधव यांना मुंबई महापालिका निवडणुकीचे तिकीट दिले आहे. जाधव यांना प्रभाग क्रमांक 209 मधून उमेदवारी मिळाली आहे. माजी आमदार मंगेश सातमकर, दीपकबाबा हांडे यांच्या घरात उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपनेही पक्षातील नेत्यांच्या नातेवाईकांना पालिका निवडणुकीत उमेदवारी दिली आहे.
कुलाब्यात भाजप-शिंदे आमनेसामने
तिकीट वाटपावरून भाजप आणि िंशदे गटात कमालीचे वितुष्ट आले आहे. कुलाबा येथील प्रभाग क्रमांक 225मध्ये भाजप व शिंदे गटाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात उभे राहिले आहेत. भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भाजवय हर्षिता नार्वेकर यांना, तर िंशदे गटाने सुजाता सानप यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महायुतीमधील दुफळी पुढे आली आहे.
मतं मागण्याआधी याची उत्तरे द्या!
केडीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या सहजीवन सोसायटीने लावलेला एक फलक उमेदवारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालत आहे. मत मागायला आलात तर उत्तर द्यायला तयार रहा असा इशाराच त्यांनी या फलकातून दिला आहे. कल्याण पूर्वेतील या सोसायटीतील तीन िंवगमध्ये 850 रहिवासी राहतात. सोसायटीतील अतिक्रमण, रस्त्याचे डांबरीकरण, समाजकंटकांनी दादागिरी करून बंद पाडलेले गॅसपाईप लाईनचे काम अशा अनेक समस्या असूनही गेल्या 10 वर्षात निवडून गेलेल्या नगरसेवकांनी काहीच काम केले नाही. त्यामुळे या निवडणुकीत जो उमेदवार सत्याच्या बाजूने उभे राहून आमचे मूलभूत प्रश्न सोडवेल त्यालाच आम्ही मतदान करू. ‘आम्ही आमचं मत विकणार नाही, आम्ही प्रश्न विचारणार आणि उत्तर घेणार’ असे बॅनरच्या माध्यमातून सुनावले आहे.



























































