अंधेरीत इमारतीला आग; 27 जणांची सुखरूप सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
khoka-bhai-satish-bhosale-house-set-on-fire-by-unknown-persons-family-members-beaten-up

अंधेरी पश्चिमेकडील चांदीवाला पर्ल रिजन्सी 18 मजली इमारतीत शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. इमारतीच्या पहिल्या मजल्यापासून दहाव्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठय़ा प्रयत्नांनंतर इमारतीत अडकलेल्या 27 जणांना सुखरुप सुरक्षितस्थळी हलवले.

इमारतीत अडकलेल्या रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढताना अग्निशमन दलाचे उदय गिझे (45), आकाश कासले (31), अमोल कानोलकर (27) हे तीन जवान जखमी झाले. तसेच, समरीन शेख (27) ही तरुणी या दुर्घटनेत जखमी झाली. धुरामुळे अन्य एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिच्यासह अन्य जखमींना उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले. या दुर्घटनेत मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत साडेचार वाजताच्या सुमारास आग विझविली.