
सरस्वती विद्यालय, कांजूरमार्ग येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष बाबा कदम, मुख्याध्यापक बाबासाहेब पुंदे, पर्यवेक्षक इंगळे, पाटील, नारकर, पवार, पाटील, सारंग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध कार्यक्रम सादर करत सावित्रीबाईंना आदरांजली वाहिली.
आरोग्य व स्वच्छतेचा प्रसार करणाऱया माता यशोदा परिवारातर्फे श्रीकृष्ण हरचांदे यांच्या नेतृत्वाखाली विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्रख्यात सर्जन डॉ. गुस्ताद डावर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अरुणा हरचांदे, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे सदस्य अतुलचंद्र कुलकर्णी, प्रख्यात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने, डॉ. विलास वडांबे उपस्थित होते. या शिबिरात 289 नागरिकांची नेत्र, रक्त तपासणी, थायरॉईड, सोनोग्राफी, ईसीजी, कान-नाक घसा तपासणी करण्यात आली. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी नेत्रशल्यचिकित्सक डॉ. सुमित लहाने, डॉ. सायली लहाने-वाघमारे, डॉ. शीतल लहाने, समाधान डायग्नोसिस सेंटरचे अरविंद जैन, निर्मलता कान–नाक-घसा क्लिनिकचे डॉ. दीपक देसाई, भाई कांबळी, शशी जाधव, नंदू साळसकर, सुभाष फरांदे यांनी विशेष श्रम घेतले.


























































