
नाशिकमध्ये तिकीट वाटपावेळी अत्यंत चुकीच्या घटना घडल्या, भाजपात असं पहिल्यांदाच झालं असून आम्ही हा विषय गांभीर्याने घेतला आहे, असे विधान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज केले. यातून त्यांनी फॉर्म पळवापळवीच्या घडलेल्या प्रकाराची कबुलीच दिली आहे.
नाशिकमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. त्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, येथे अत्यंत चुकीच्या घटना झाल्या, पक्षात पहिल्यांदाच असे झाले आहे. परिणामांचा विचार करून यासंदर्भात येत्या काही दिवसात निर्णय घेतला जाईल. पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निष्कर्षांपर्यंत पोहोचता येईल.




























































