धुळय़ात भाजपकडून बिनविरोधसाठी एक कोटीची ऑफर

राज्यातील 29 महानगरपालिकांची प्रथमच एकाच वेळी निवडणूक होत आहे. त्यात मोठय़ा प्रमाणात बिनविरोध पॅटर्न दिसला. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दमदाटी आणि पैशांचे मोठे आमिष दिल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. धुळे महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे संजय वाल्हे यांनी भाजपवर उमेदवारी मागे घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा खुलासा केला असून ती ऑफर नाकारल्याचा दावाही त्यांनी केला आहे. वाल्हे यांची पत्नी सविता या धुळय़ात प्रभाग क्रमांक 10 मधून निवडणूक लढवीत आहेत. त्यांनी माघार घेण्यासाठी 1 कोटी रुपयांची ऑफर भाजपकडून आल्याचे संजय वाल्हे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओतून म्हटले आहे.