असं झालं तर… एटीएममधून फाटकी नोट आली…

एटीएममधून एखाद्या वेळी फाटकी नोट आली तर या  नोटेचे काय करायचे असा प्रश्न पडतो. ही नोट दुकानदार घेत नाही. अशा वेळी घाबरण्याची गरज नाही.

आरबीआयने एटीएममधून आलेल्या फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी काही नियम बनवले आहेत. कोणतीही बँक फाटलेल्या नोटा बदलून देण्यासाठी नकार देऊ शकत नाही.

ज्या बँकेच्या एटीएममधून तुम्ही पैसे काढले आहेत. तिथे एक अर्ज द्यावा. त्या अर्जात पैसे काढल्याची तारीख, वेळ, ज्या ठिकाणाहून पैसे काढण्यात आले त्याची माहिती लिहा.

त्या अर्जासोबत एटीएममधून आलेली ट्रान्झेक्शनसंबंधित स्लिपही अटॅच करावी लागेल. मोबाइलवर आलेल्या ट्रान्झेक्शन डिटेल्सची माहिती द्यावी लागेल.

2016 मध्ये रिझर्व्ह बँकेने एक सर्पुलरमध्ये सांगितले की, जर बँकेने खराब नोट बदलून देण्यासाठी नकार दिला, तर त्यांना 10 हजार रुपये दंड भरावा लागू शकतो.