
अनेक जणी दुधावर तयार होणारी क्रीम साठवून ठेवतात आणि त्यातून तूप काढतात. दूधाची साय घट्ट आणि जाड येण्यासाठी काही टिप्स वापरता येतील. दूध थेट फ्रिजमधून गॅसवर ठेवू नका. दूध खोलीच्या तापमानावर येऊ द्या. यानंतर मध्यम आचेवर उकळवा. उकळल्यानंतर गॅस बंद करा.
दूध गरम केल्यानंतर त्यावर बंद प्लेट ठेवू नका. जाळीदार प्लेट गाळणी वापरा. दूध खोलीच्या तापमानावर आल्यानंतर तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता. जर तुम्हाला दुधात जाड मलई हवी असेल आणि ती साठवायची असेल तर तुम्ही मातीचे भांडे वापरावे.


























































