
अहिल्यानगर–मनमाड राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून, या गंभीर पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन व ठेकेदारांच्या निक्रियतेविरोधात राहुरी येथे रस्ता कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सदस्य आक्रमक झाले असून, महामार्गाच्या संथ व निकृष्ट कामामुळे वाढत असलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर थेट उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठाम निर्णय यावेळी घेण्यात आला.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर–मनमाड महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व मंत्री गिरीश महाजन यांना जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्यामार्फत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, येत्या 15 दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जन आंदोलन छेडून थेट ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा इशारा रस्ता कृती समितीने दिला आहे.
भारत भुजाडी, व्यापारी अध्यक्ष प्रकाश पारख, देवेंद्र लांबे, नवनीत दरक, बाळासाहेब उंडे, राजेंद्र खोजे, संजय कुलकर्णी, विलास आहेर, इंजि. अविनाश गाडे, श्रीकांत शर्मा, रवींद्र आहेर, नितेश राका, आनंद देसर्डा, तात्या वराळे, सुनील देशपांडे, अनिल देशपांडे, अंजाबापू उहें, भाऊसाहेब बिडवे, विलास तरवडे, गणेश घाडगे, अशोक कदम, दत्तात्रय धनवटे आदी उपस्थित होते.

























































