श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासात लाईव्ह दर्शन

पंढरपुरात दर्शनासाठी येणाऱया भाविकांसाठी निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शहरातील सर्व्हे 59 येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासात वास्तव्यास असलेल्या भाविकांना थेट श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे लाईव्ह दर्शन घेता यावे, यासाठी अत्याधुनिक एलईडी क्रीन बसविण्यात आले असून, भक्तीमय वातावरण निर्माण व्हावे यासाठी भक्तीगीतांसाठी साऊंड सिस्टीमदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधांचा लोकार्पण सोहळा शनिवारी (दि. 3) भक्तनिवास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते पार पडला. यावेळी समितीचे सदस्य हभप ज्ञानेश्वर देशमुख (जळगांवकर), प्र. व्यवस्थापक संदेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास संजय कोकीळ, राजेंद्र सुभेदार, शंकर मदने, पांडुरंग बुरांडे, सावता हजारे राजेंद्र घागरे, संदीप कुलकर्णी, विशाल देवकते, भाऊसाहेब घोरपडे, अरुण सलगर, सिद्धार्थ खिस्ते, अनंता रोपळकर उपस्थित होते.

सदरची एलईडी क्रीन इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या सेवाभावी योगदानातून उपलब्ध करून देण्यात आली असून, साऊंड सिस्टीम पुणे येथील दानशूर देणगीदारा अनिल भन्साळी यांच्याकडून प्रदान करण्यात आली आहे. भक्तनिवासातील वातावरण अधिक भक्तीपूर्ण व शांत राहावे, भाविकांना निवासस्थानी असतानाच श्रींचे दर्शन व भक्तीगीतांचा आनंद घेता यावा, या हेतूने या सुविधा बसविण्यात आल्याचे डॉ. कदम यांनी सांगितले. याशिवाय, शासनाने जीएसटीमध्ये कपात केल्यानंतर भक्तनिवासातील खोल्यांचे दरही कमी करण्यात आले असून, भाविकांसाठी www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून ऑनलाइन बुकिंगची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात
आली आहे.

या भक्तनिवासात सुमारे 1500 भाविकांची निवास व्यवस्था असून, व्यापारी गाळे, कार्यालये, उपहारगृह, गरम पाण्याची सुविधा, तबक उद्यान, प्रशस्त पार्ंकग, लिफ्ट, सुरक्षा व्यवस्था, जनरेटर, वातानुकूलित सुविधा, सीसीटीव्ही कॅमेरे आदी सर्व अत्याधुनिक सोयी उपलब्ध आहेत. या कॅम्पसमध्ये ग्रीन बिल्डिंग मानांकन प्राप्त आकर्षक चार इमारती असून, 2 बेड, 5 बेड, 8 बेडच्या खोल्या, तसेच व्हीआयपी सूट व वन बीएचके
फ्लॅट्स उपलब्ध आहेत. याशिवाय 24 तास चेक-आऊट सुविधा देण्यात आली आहे. भक्तनिवास येथे येणाऱया भाविकांना निवास, सुविधा व भक्तीमय वातावरण या तिन्हींचा एकत्रित अनुभव मिळणार आहे, असे मंदिर समितीचा व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सांगितले.