
बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना याने अलीकडेच त्याच्या नव्याने सुरू झालेल्या यूट्यूब चॅनेलवर चाहत्यांसोबत एक मजेदार आणि विनोदी क्षण शेअर केला. त्याने त्याचा जवळचा मित्र आणि सहकारी स्पर्धक प्रणित मोरे याच्यासोबत रिअॅलिटी शोमध्ये जिंकलेल्या कारबद्दल विनोद केला. त्याच्या नवीन व्हीलॉगमध्ये, गौरवने खुलासा केला की, जेव्हा तो एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी प्रणीतला भेटला तेव्हा त्याच्यांत झालेल्या गप्पांमधून अनेक विषयांवर भाष्य झाले. त्याचवेळी बिग बाॅस या शोमध्ये जिंकलेल्या कारसंदर्भातही गप्पा झाल्या. त्याचवेळी गौरव म्हणाला, “ती कार मला अजून मिळालेली नाही.”
शो संपल्यानंतरही आजही गौरव आणि प्रणित यांच्यातील मैत्रीचे बंध अजूनही कायम आहेत. गौरवने डिसेंबरमध्ये बिग बॉस 19 जिंकल्यानंतर लगेचच त्याचे युट्यूब चॅनल लाँच केले आहे. जेणेकरून चाहत्यांना टेलिव्हिजनच्या पलीकडे असलेल्या त्याच्या आयुष्याबद्दल जवळून माहिती मिळेल. त्याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये त्याने इंडस्ट्रीमधील त्याच्या प्रवासाबद्दल आणि रिअॅलिटी शोमध्ये घालवलेल्या कठीण काळाबद्दल सांगितले. त्याने अनुपमा आणि सेलिब्रिटी मास्टरशेफवरील त्याच्या कामासह त्याच्या अभ्यासाबद्दल आणि एकूणच कारकिर्दीवर देखील भाष्य केले आहे. यू ट्यूब चॅनेल सुरु करण्याचे श्रेय गौरव, प्रणित मोरे आणि युट्यूबर मृदुल तिवारी यांना श्रेय देतो.


























































