
रेशन कार्डमधून नाव कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या वेबसाइटवर जाऊन
ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
याशिवाय नजीकच्या रेशन कार्ड कार्यालयात जाऊन नाव वगळण्याचा फॉर्म नंबर 4 भरून आवश्यक कागदपत्रे (उदा. विवाह प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा) जोडावा.
ऑनलाइन प्रक्रियेसाठी राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या वेबसाइटला भेट देऊन पुढील प्रक्रिया करता येईल. त्यासाठी
लॉग इन करावे लागेल.
त्यानंतर वेबसाईटवर ‘रेशन कार्डमध्ये नाव कमी करणे’ किंवा तत्सम पर्याय शोधा आणि कागदपत्रे अपलोड करा. अर्ज सबमिट करा आणि पावती डाउनलोड करून ठेवा.
या प्रक्रियेस काही दिवस लागू शकतात. साधारण महिना तरी लागू शकतो. अर्ज क्रमांकाच्या आधारे अर्जाचे स्टेटस तपासता येते.































































