
वैचारिक मतभेद असले तरी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता यावी यासाठी त्यांना पाठिंबा असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज धाराशीव-सोलापूर जिह्याच्या सीमेवर शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शेतकऱयांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले की, वैचारिक मतभेद असले तरी मुंबईत मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंची महापालिकेत सत्ता यावी त्यांना पाठिंबा आहे. राज्यात इतर महापालिकेत काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्या राजू शेट्टींनी मुंबईत मराठी महापौर असावा असं म्हणत ठाकरेंना पाठिंबा दिला. तर महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातला किती पाठवले त्याची माहिती घ्या म्हणजे त्यावरून मराठीवर मुख्यमंत्र्यांचे प्रेम दिसून येईल असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.






























































