शिवसेनेला भारतीय बहुजन आघाडीचा पाठिंबा

मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी आणि शिवसेनेचा महापौर व्हावा यासाठी भारतीय बहुजन आघाडीच्या वतीने शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला भारतीय बहुजन आघाडी जाहीर पाठिंबा देत आहे, अशी माहिती भारतीय बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बी. जी. गायकवाड यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. मुंबईचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अखिल भारतीय मातंग संघ, बी गटाच्या वतीने गेली अनेक वर्षे शिवसेनेला पाठिंबा देत आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.