
कोल्हापूर आणि पहिलीच महानगरपालिका निवडणूक होणाया इचलकरंजीमध्ये प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आला आहे. मतदारांचा कौल कोणाला मिळेल, याची धाकधूक आता सर्व उमेदवारांमध्ये वाढली आहे.प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आता विजयासाठी सर्व मार्गांचा अवलंब करण्यात येत असून मतदारांना मोठया प्रमाणात लक्ष्मीदर्शन होत आहे. दोन्ही महापालिकांमध्ये नळांमध्ये दररोज पाणी येत नसले, तरी ठअर्थगंगेठला पूर आला आहे.
कोल्हापुरात 10 वर्षांनी महानगरपालिकेची निवडणूक होत आहे. इचलकरंजीमध्ये पहिलीच महापालिका निवडणूक आहे. दोन्ही महापालिकांसाठी शंभरपेक्षा जास्त कोटयधीश उमेदवार आहेत. मतदारांना खुश करण्यासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कोणते तरी निमित्त साधून जेवणाची सोय, धार्मिक महाप्रसादाचे आयोजन, संक्रांती निमित्त हळदीकुंकू आयोजन तसेच भेटवस्तू देण्यात येत आहेत. कोल्हापूर महापालिकेत 87 उमेदवार कोटयधीश आहेत.




























































