
आपल्या त्वचेसाठी विविध प्रकारची पाणीदार फळे ही फार महत्त्वाची मानली जातात. यामध्ये लिंबू देखील आहे. लिंबू त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात असलेले व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक अॅसिड त्वचा स्वच्छ, चमकदार आणि डागमुक्त ठेवण्यास मदत करते. परंतु चेहऱ्यावर लिंबू लावताना मात्र काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे.
चेहऱ्यावर चमक येण्यासाठी हे दोन पदार्थ लावायलाच हवेत, जाणून घ्या
लिंबू हे आपल्या त्वचेसाठी नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करते. परंतु अधिक आम्ल असल्यामुळे, चेहऱ्यावर लालसरपणा, जळजळ होते. चेहऱ्यावर लिंबू लावताना काही गोष्टी या लक्षात ठेवणे खूप गरजेच्या असतात. बरेच लोक लिंबू आणि टूथपेस्ट एकत्र करुन चेहऱ्यावर लावतात. चेहऱ्यावरील मुरुमे आणि डाग दूर करण्यासाठी, हे मिश्रण चेहऱ्यावर लावले जाते. मूळात म्हणजे ही पद्धत अत्यंत हानिकारक आहे. टूथपेस्टमध्ये रसायने, मेन्थॉल आणि ब्लीचिंग एजंट असतात. लिंबामध्ये मुबलक प्रमाणात आम्लता असतो. यामुळे हे मिश्रण त्वचेवर लावल्याने, त्वचेची जळजळ, पुरळ येते.
मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या
लिंबू आणि बेकिंग सोडा – ही रेसिपी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, परंतु ती त्वचेसाठी धोकादायक आहे. लिंबू आम्लयुक्त आहे आणि बेकिंग सोडा अल्कधर्मी आहे. या दोन्हींचे मिश्रण केल्याने त्वचेचा नैसर्गिक pH बिघडतो. ज्यामुळे ती कोरडी, ताणलेली आणि संवेदनशील राहते. सतत वापरल्याने काळे डाग देखील येऊ शकतात.
आपल्या आहारात बार्ली समाविष्ट करण्याचे काय फायदे होतात, जाणून घ्या
लिंबू आणि हळद – हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असतात, परंतु लिंबूसोबत एकत्र केल्यास ते प्रत्येक त्वचेला हे सूट होत नाही. हे मिश्रण त्वचेवरील लालसरपणा, जळजळ वाढवू शकते.
हे लक्षात ठेवा – कधीही लिंबाचा रस थेट चेहऱ्यावर लावू नका. लिंबाच्या रसामध्ये कायम पाणी किंवा गुलाबजल घालावा. त्यानंतर कापसाच्या बोळ्याने, हळूवारपणे चेहऱ्यावर लावावा. जास्तीत जास्त हे मिश्रण चेहऱ्यावर पाच ते दहा मिनिटे ठेवावे. त्यानंतर लगेच चेहरा धुवावा. चेहरा धुताना गरम पाण्याचा वापर न करता थंड पाण्याने चेहरा धुवावा. चेहरा धुतल्यानंतर न विसरता मॉइश्चरायझर लावावे. लिंबाचे मिश्रण दिवसा लावण्यापेक्षा रात्री झोपण्याआधी लावणे अधिक हितावह.


























































