केसातील कोंडा तुमच्याही कपड्यांवर पडतोय का? आता चिंता सोडा, या टिप्स अमलात आणून कोंड्याला करा कायमचा रामराम

केसांमध्ये अधिक प्रमाणात कोंड्याची समस्या ही हिवाळ्यात दिसून येते. काहीजणांच्या डोक्यात तर बारमाही कोंडा दिसून येतो. कोंड्यामुळे अनेकदा चारचौघांमध्ये आपल्याला ओशाळल्यासारखे होते. कोंडा आपल्या कपड्यांवर पडल्यावर आपले हसे होते. परंतु आता मात्र काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्सचा अवलंब करुन कोंड्यावरही मात करता येईल.

चेहऱ्यावर मलई लावण्याचे काय फायदे होतात, वाचा

आजकाल डोक्यातील कोंडा ही एक सामान्य समस्या बनली आहे आणि त्यामुळे खाज सुटणे आणि केस गळणे होऊ शकते. जर तुम्हालाही डोक्यातील कोंडा होत असेल तर काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही आराम मिळवू शकता. नारळ तेल, लिंबू, कोरफड आणि दही यासारखे नैसर्गिक घटक टाळूला पोषण देतात आणि बुरशीजन्य संसर्ग कमी करतात. या उपायांचे नियमितपणे पालन केल्याने तुम्हाला आठवड्यातून डोक्यातील कोंड्यात लक्षणीय सुधारणा दिसून येते.

तुम्हीही चेहऱ्यावर लिंबू लावताना या चुका करताय का?

बदलती जीवनशैली, अस्वास्थ्यकर खाण्याच्या सवयी, ताणतणाव आणि विविध शॅम्पू यामुळे केसांमध्ये कोंडा सर्वाधिक होण्यास सुरुवात होते. काही निरोगी सवयी आणि घरगुती उपायांचा अवलंब केल्याने डोक्यातील कोंड्यापासून लक्षणीयरीत्या आराम मिळू शकतो. केसांच्या कोंड्यासाठी दररोज केसांना कंगवा करणे खूप गरजेचे आहे. केसांना नियमितपणे कंगवा केल्याने, टाळूचे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे केसांची उत्तम वाढ होण्यास मदत होते. डोक्यातील कोंड्यासाठी नेहमी चांगल्या दर्जाचे अँटी-कोंड्या शॅम्पू वापरायला हवेत. यामुळे प्रामुख्याने ​​झिंक पायरिथिओन असलेले शॅम्पू निवडा, कारण ते बुरशीजन्य संसर्ग कमी करते आणि डोक्यातील कोंड्यापासून मुक्त होण्यास प्रभावी आहे.

हिवाळ्यात चेहऱ्याला फेशियल किंवा क्लीनअप यापैकी काय करणे श्रेयस्कर आहे? जाणून घ्या

कोरफडीमध्ये बुरशीविरोधी आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहेत. ताज्या कोरफडीचा रस काढून टाळूमध्ये पूर्णपणे मालिश करा. सुमारे एक तासानंतर थंड पाण्याने केस धुवा. नियमितपणे असे केल्याने कोंडा, खाज सुटणे आणि जळजळ यापासून आराम मिळतो. तुम्ही नारळाच्या तेलात कापूर मिसळून देखील टाळूवर लावू शकता. तसेच अश्या पद्धतीने किमान आंघोळीच्या अर्धा तास आधी या तेलाने केस आणि टाळूची मालिश करावी. यामुळे टाळूला चांगले पोषण मिळते. यामुळे बुरशीजन्य संसर्गही कमी होण्यास मदत मिळते.

मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या

कोंडा खूप प्रमाणात असेल तर, आठवड्यातून 2 ते 3 वेळा चांगल्या दर्जाच्या अँटी-डँड्रफ शॅम्पूने तुमचे केस धुवा. यामुळे टाळू स्वच्छ राहते आणि कोंडा लक्षणीयरीत्या कमी होतो. लक्षात ठेवा की, अधिक प्रमाणात शॅम्पूचा वापर केल्याने केस कोरडे होतात. एक ग्लास पाण्यात चार चमचे बेसन मिसळून जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या टाळूला आणि केसांना लावा आणि एक तासासाठी तसेच राहू द्या. नंतर, तुमचे केस स्वच्छ पाण्याने धुवा. बेसन टाळूवरील घाण काढून टाकण्यास मदत करते आणि कोंडा कमी करते.