हिवाळ्यात दही लावताना काय काळजी घ्यायला हवी?

दही लावण्यासाठी उन्हाचा कालावधी हा खूप चांगला मानला जातो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये दही लावण्यासाठी कुठलीही मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु हिवाळ्यात मात्र दही लावताना फार डोकेदुखी होते. हिवाळ्याच्या सीझनमध्ये दही नीट लागत नसल्यामुळे, ते पाण्यासारखे वाहते. पाणीदार दही खायलाही मजा येत नाही. म्हणूनच पावसाळ्यात दही लावताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेतली तर दही सर्वात उत्तम लागु शकते. शिवाय हे घट्ट आणि दाटसर दही खाण्याची मजा ही काही औरच असते.

मेंटली फीट राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, जाणून घ्या

दही लावताना हे लक्षात ठेवायला हवे

दुधामध्ये विरजण घातल्यानंतर, किमान चार ते पाच ते मिश्रण अजिबात ढवळू नये. असे केल्यास दही पाण्यासारखे पातळ होते.

विरजण लावताना फुल क्रीम दुधाचा वापर करावा. त्यामुळे दह्याची गुणवत्ता सुधारते तसेच दही उत्तम प्रतीचे लागते.

मिठाईच्या दुकानातील दही एकदम वडीप्रमाणे पडते. अशापद्धतीचे दही हवे असल्यास, दुधात किमान एक किंवा दोन चमचे मिल्क पावडर घालावी.

हिवाळ्यात दुधासोबत काय खायला हवे?

दही विरजण्यासाठी मातीच्या भांड्याचा वापर करणे सर्वात उत्तम मानले जाते. मातीच्या भांड्यामध्ये दही उत्तम लागते.

गोड आणि घट्ट दही लागण्यासाठी तापमान किमान 40 ते 42 अंश इतके असायला हवे.

दह्याला गोडवा येण्यासाठी, दही लावताना दूधाच्या तापमानाचाही अंदाज घेणे गरजेचे आहे. ज्या दुधामध्ये तुम्हाला गरम केल्यानंतर, सहज बोट घालता येईल असे दही लावण्यासाठी सर्वात उत्तम. म्हणजेच जर ते कोमटपेक्षा थोडे जास्त गरम दूध असल्यास ते सर्वात उत्तम.

हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, जाणून घ्या

दही लावण्यासाठी तापमानाचं गणित व्यवस्थित लक्षात ठेवायला हवं. विरजण घालताना दूध खूप गरम असल्यास, विरजणातील बॅक्टेरिया मरतील. विरजणातील बॅक्टेरिया मेले तर, दही आंबट होण्याची शक्यता सर्वाधिक असते.

दही लावताना मूळात विरजण आंबट नसावे. विरजण आंबट असेल तर दही पातळ होते.