
इस्रो पीएसएलव्ही-सी62 मिशन सोमवारी तांत्रिक बिघाडामुळे पूर्ण होऊ शकले नाही. पीएसएलव्ही रॉकेटद्वारे अन्वेषा उपग्रह आणि 14 सह-प्रवासी उपग्रह प्रक्षेपित केले जाणार होते. नवीन वर्षातील इस्रोची ही पहिलीच मोहीम होती. मोहिमेदरम्यान काही तांत्रिक अडचण आल्याचे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायण यांनी सांगितले.
आज सकाळी आंत्रातील श्रीहरिकोटा येथून पीएसएलव्ही-सी62 द्वारे अन्वेषासह 15 उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. हा एक गुप्तचर उपग्रह आहे जो अचूक देखरेख आणि मॅपिंगसाठी प्रगत इमेजिंग क्षमतांनी सुसज्ज आहे. तो पृथ्वीपासून शेकडो किलोमीटर वरूनही झुडुपे, जंगले किंवा बंकरमध्ये लपलेल्या शत्रूंचे फोटो टिपू शकतो. हा उपग्रह पृथ्वीपासून सुमारे 600 किलोमीटर वर सूर्य-समकालिक कक्षमध्ये तैनात करण्याचे नियोजन होते. मोहिमेच्या तिसऱया टप्प्यात तांत्रिक बिघाड आढळून आला, ज्यामुळे उपग्रह त्याच्या इच्छित कक्षेत तैनात होऊ शकला नाही.

























































