
लग्नानंतर वेगळे राहणे, भावंडांमध्ये वाटणी होणे किंवा रोजगारानिमित्त वेगळा संसार थाटणे अशी कुटुंब विभक्त होण्याची कारणे असतात.
स्वतंत्र रेशनकार्ड मिळवण्यासाठी ती व्यक्ती आधीच्या रेशनकार्डवर नाव नोंदवलेली असावी किंवा कुटुंबप्रमुखाची संमती/पुरावा सादर करता येणे गरजेचे असते.
स्वतंत्र रेशनकार्डसाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन, दोन्ही पद्धतीने करता येतो. राज्य सरकारच्या ‘महा-फूड’ किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर अर्ज करावा.
अर्ज भरताना कुटुंबाची माहिती, पत्ता आणि जुन्या रेशनकार्डचा तपशील अचूक भरावा लागतो. ऑफलाइन पद्धतीत अन्नपुरवठा कार्यालय किंवा सेवा केंद्रात अर्ज करा.
आधारकार्ड, जुन्या रेशनकार्डची प्रत, विभक्त झाल्याचा पुरावा (कुटुंब विभाजनाचा करारनामा, नोटरी केलेले प्रतिज्ञापत्र), रहिवासी पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल.


























































