कांजूरमध्ये शिंदे गटाला खिंडार, शेकडो पदाधिकारी शिवसेनेत

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग जोरात सुरु आहे. कांजूर विभागात शिंदे गटाला खिंडार पडले असून अनेक महिला आणि पुरुष पदाधिकाऱयांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. या सर्वांचे शिवसेना नेते-आमदार भास्कर जाधव, शिवसेना आमदार सुनील राऊत यांनी पक्षात स्वागत केले.

शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱयांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यात शिंदे गटाच्या शाखाप्रमुख सुवर्णा पावसकर, उपशाखाप्रमुख योगिता लाड यांच्यासह रूपाली माजलकर, गौरी भोसले, जयश्री गुरव, जागृती लाड, नम्रता मस्कर, राणी चिकणे, रूपाली चव्हाण, पूजा शिगवण, नीलम पवार, नीता पारकर, संगीता इंगवले, प्रणाली गुरव, नवनाथ भोसले, पार्थ भोसले, कुणाल येरुणकर, पांडुरंग गुरव, प्रथम लाड, स्वप्निल पावसकर, सिद्धेश पावसकर, कार्यालय प्रमुख दीपक कदम, उपशाखा प्रमुख मनोज सिंग आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपच्या माजी वॉर्ड अध्यक्ष अश्विनी सूर्यवंशी यांच्यासह इतर महिला पदाधिकाऱयांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे.