चांदीची ‘चांदी’!

सोने-चांदीचे दर सलग दुसऱया दिवशी विक्रमी उच्चांकावर पोहोचले. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशननुसार एक किलो चांदीची किंमत 6,566 रुपयांनी वाढून 2,62,742 रुपयांवर पोहोचली. सोमवारी चांदीचा दर प्रति किलो 2,57,283 रुपये एवढा होता. दोन दिवसांत चांदीच्या दरात 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे. एक तोळा 24 पॅरेट सोन्याचा भाव 33 रुपयांनी वाढून 1,40,482 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. काल सोन्याचा दर 1,40,449 रुपये प्रति तोळा होता. चांदीच्या मागणीत सध्या तेजी आहे आणि ती पुढेही कायम राहण्याचा अंदाज आहे. अशा परिस्थितीत चांदी या वर्षी 2.75 लाखांपर्यंत जाऊ शकते, तर सोन्याचे दर वर्षअखेर प्रतितोळा दीड लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज आहे.