
मुंबईतील वॉर्ड क्र. 182 मधून शिवसेनेचे मिलिंद वैद्य विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या राजन पारकर यांचा पराभव केला. या विजयानंतर मिलिंद वैद्य यांनी प्रतिक्रीया देताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व माहिमकरांचे आभार मानले आहेत.
”मी बाळासाहेबांच्या मुशीतून तयार झालेलो शिवसैनिक आहे. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी माहिम मच्छिमार वसाहत, पोलीस वसाहत, दर्गास्ट्रीट इथली शिवसेनची शक्ती कायम आहे हे माझ्या रुपाने दाखवून दिले आहे. माहिममध्ये सत्ताधाऱ्यांनी खालच्या थराला राजकारण झालं. पण उद्धव साहेबांनी जे पाठबळ दिलं त्याचा प्रत्यय आज दिसून येतोय. माहिमकरांनी दाखवून दिलं शिवशक्ती पुढे धनशक्ती काहीच कामाची नाही”, असे मिलिंद वैद्य म्हणाले.





























































