BMC Election 2026 – गोरेगाव वॉर्ड क्र. 56 मध्ये शिवसेनेच्या लक्ष्मी भाटिया यांचा दणदणीत विजय

मुंबई महापालिका निवडणुकीचा गोरेगाव वॉर्ड क्र. 56 चा निकाल जाहीर झाला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार लक्ष्मी नितीन भाटिया यांनी भाजप उमेदवार राजूल समीर देसाई यांचा दारुण पराभव करत विजयाची माळ गळ्यात घातली. लक्ष्मी भाटिया यांचा 11455 मतांनी दणदणीत विजय झाला आहे.

भाटिया यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ‘हर हर महादेव’, ‘बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव साहेब ठाकरेंचा विजय असो’ अशा घोषणा देत जल्लोष साजरा केला.

हे एकटीचं श्रेय नाही, सर्व सहकाऱ्यांचं आणि टीमचं श्रेय आहे. उद्धव साहेब आणि देसाई साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास माझ्या टीमने सार्थ करून दाखवला. बंडखोरांना आमच्या विजयाने आम्ही उत्तर दिलं आहे, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी भाटिया यांनी दिली आहे.