रवींद्र धंगेकरांना धक्का; पुण्यातील प्रभाग 23 मधून पत्नीचा पराभव

पुण्यात रवींद्र धंगेकरांना मोठा धक्का बसला असून पुण्यातील प्रभाग 23 मधून धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव झाला आहे. तर आंदेकर टोळीतील सोनाली आंदेकर यांचा विजय झाला आहे. सोनाली आंदेकर यांनी तुरुंगातूनच निवडणूक लढवली होती.

कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची स्नुषा आणि तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नगरसेवक वनराज आंदेकर यांची पत्नी सोनाली आंदेकर यांना अजित पवार यांच्या गटाने उमेदवाी दिली होती. त्यांनी शिंदे गटाच्या धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा पराभव केला आहे. धंगेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यात आता शिंदे गटाचे धंगेकर यांच्या पत्नीचा पराभव झाला आहे.