Jammu Kashmir Encounter – किश्तवाडमध्ये चकमकीत जखमी जवानाला उपचारादरम्यान वीरमरण

जम्मू आणि कश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक झाली. या चकमकीत 8 जवान जखमी झाले. जखमींपैकी लष्कराच्या विशेष दलाच्या एका जवानाचा सोमवारी उपचारादरम्यान वीरमरण आले. किश्तवाडमध्ये दुसऱ्या दिवशीही शोधमोहीम सुरू आहे. हवालदार गजेंद्र सिंह अशी शहीद जवानाचे नाव आहे.

पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदचे काही दहशतवादी किश्तवाडमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सुरक्षा दलाने ‘ऑपरेशन त्राशी-1’ राबवले. शोधमोहिमेदरम्यान, चत्रू पट्ट्यातील मांद्रल-सिंगपोराजवळील सोनार गावात दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक सुरू झाली. दहशतवाद्यांनी अचानक ग्रेनेड फेकल्याने आठ जवान जखमी झाले. जखमींपैकी गजेंद्र सिंह यांना उपचारादरम्यान वीरगती प्राप्त झाली.