सुधारणार नाहीत! आईस्क्रीम कप, बॉटल, प्लॅस्टिक… नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये कचरा फेकून प्रवाशी पसार, Video आला समोर

वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना आरामदायक प्रवासाचा अनुभव घेता येत आहे. ऑटोमोटिक दरवाजे, बायो टॉयलेट, पर्सनल रीडिंग लाईट्स इ. अशा अनेक आत्याधुनिक सुविधांनीयुक्त असणाऱ्या या वंदे भारत स्लीपर ट्रेननमध्ये काही प्रवासी कचरा फेकून पसार झाल्याने प्रवाशांच्या या मानसिकतेवर संताप व्यक्त केला जात आहे. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन हावडा आणि गुवाहाटी या मार्गावर धावत आहे. या ट्रेनचा वेग तेजस एक्स्प्रेससारखा सुसाट आहे. तर ट्रेनमधल्या सुविधा या राजधानी एक्स्प्रेससारख्या आहेत. त्यामुळे ट्रेन प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे. असे असताना या आत्याधुनिक सुविधांचा लाभ घेत ट्रेनमध्येच कचरा करणाऱ्या प्रवशांची संख्या वाढताना दिसत आहे. एकीकडे इतर लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवास करताना दुर्गंधी, कचरा, गर्दी, अस्वच्छता या सर्व गोष्टींचा प्रवशांना सामना करावा लागतो. मात्र, आता नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होते का? असा प्रश्न सर्व सामान्यांना पडू लागला आहे. एका प्रवाशाने आपला प्रवास पूर्ण झाल्यानंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आईस्क्रिमचे कप, प्लॅस्टिक, बॉटल, टिश्यू सारख्या वस्तू ट्रेनमध्येच फेकून प्रवाशी निघून गेल्याचं दिसून येत आहे.