
रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले.रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिक सज्ज झाले आहेत.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून खालगाव गटात विनोद शितप यांनी उमेदवारी अर्ज भरला.नाचणे जिल्हा परिषद गटातून शशिकांत बारगोडे यांनी उमेदवारी अर्ज भरला. तर कर्ला जिल्हा परिषद गटातून विलास भातडे यांनी उमेदवारी अर्ज भरला.पावस जिल्हा परिषद गटातून रविकिरण तोडणकर यांनी उमेदवारी अर्ज भरला.
रत्नागिरी पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून करबुडे गणातून सुरेश कारकर यांनी उमेदवारी अर्ज भरला. कुवारबांव गणातून उमेश राऊत यांनी उमेदवारी अर्ज भरला. नाचणे गणातून विजय ढेपसे यांनी उमेदवारी अर्ज भरला. हरचिरी गणातून दत्तात्रय गांगण यांनी उमेदवारी अर्ज भरला. पावस गणातून सुभाष पावसकर यांनी उमेदवारी अर्ज भरला.उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.



























































