
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे चार नवनिर्वाचित नगरसेवक अचानक गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चारही नगरसेवकांना विरोधकांनी जबरदस्तीने डांबून ठेवल्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी शिवसेनेने केली असून आज कल्याण जिल्हाप्रमुख शरद पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली.
निकालाच्या दुसऱया दिवसापासून शिवसेनेचे मधुर म्हात्रे, अॅड. कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नाली केणे हे बेपत्ता आहेत. बहुमताचे गणित जमवण्यासाठीच विरोधकांनी नगरसेवकांची पळवापळवी केली आहे. त्यांच्या जीविताला धोका आहे. त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अशी मागणी तक्रारीत केली आहे.































































