कर्तव्य पथावर गणेशोत्सव!

77 व्या प्रजासत्ताक दिनाची तयारी पूर्ण झाली आहे. प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथावर होणारे लष्कराचे संचलन, शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, थरारक कवायती आणि देशातील वेगवेगळ्या राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे चित्ररथ खास आकर्षण असणार आहे. यंदा या चित्ररथामध्ये महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचा देखावा पाहायला मिळणार आहे. चित्ररथासाठी आत्मनिर्भरतेचे प्रतीक म्हणून गणेशोत्सव ही संकल्पना मांडण्यात आली आहे. अष्टविनायकांच्या प्रतिकृती, ढोलताशे, बाप्पाची मूर्ती दिसणार आहे.