
‘रिच डॅड, पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सध्याच्या जागतिक स्थितीबाबत भाष्य केले आहे. सध्याची जागतिक स्थिती आणि अर्थव्यवस्था बिकट अवस्थेत आहेत. मात्र,आता मला कसलीही चिंता नाही, मी दररोज श्रीमंत होत आहे, असे ते म्हणाले आहे. आपण अनेक वर्षांपासून सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करण्याचा सल्ला देत आहोत. आता जागतिक स्थिती बिकट असली तरी सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी केले असल्याने मी दररोज श्रीमंत होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये सुरू असलेल्या चढउतारांने मला काहीही फरक पडत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कियोसाकी नियमितपणे गुंतवणूक टिप्स देतात. त्यांच्या गुंतवणूक सल्ल्यामध्ये सोने, चांदी आणि आघाडीची क्रिप्टोकरन्सी, बिटकॉइन यांचा समावेश आहे आणि ते या मालमत्तांना श्रीमंत होण्याचे साधन मानतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर (आता एक्स) वरील त्यांच्या याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये सतत होणाऱ्या चढउतारांचा संदर्भ देत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
सोने, चांदी आणि बिटकॉइनच्या किमतींमध्ये सतत होणाऱ्या चढउतारांची मला काळजी नाही. कारण मला माहित आहे की अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज वाढत आहे आणि अमेरिकन डॉलरची खरेदी शक्ती कमी होत आहे. त्यामुळे सोने, चांदी आणि बिटकॉइन आणि इथरियम सारख्या क्रिप्टोकरन्सीच्या किमतींबद्दल काळजी का करावी. संधी मिळताच प्रत्येक वेळी मी फक्त सोने, चांदी आणि बिटकॉइन खरेदी करत राहतो आणि श्रीमंत होत जातो, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
रॉबर्ट कियोसाकी यांनी चांदीमध्ये गुंतवणूक करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. श्रीमंत होण्याचा हा सर्वात योग्य मार्ग असल्याचे वर्णन करून, त्यांनी चांदीच्या किमतीसाठी $200 ची लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सातत्याने वाढणारी मागणी आणि गगनाला भिडणाऱ्या चांदीच्या किमती यामुळे गेल्या काही दिवसांत त्यांचे भाकिते खरे ठरत असल्याचे दिसत आहे.

























































