दीदींनी ED ला हरवले, आता त्या भाजपलाही हरवतील; ममता बॅनर्जी यांची भेट घेल्यानंतर अखिलेश यादव यांचं वक्तव्य

दीदींनी ईडीचा पराभव केला आणि आता त्या भारतीय जनता पक्षाचाही पराभव करतील, असं समाजवादी पक्षाचे अध्यक्ष खिलेश यादव म्हणाले आहेत. अखिलेश यादव यांनी मंगळवारी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.

अखिलेश यादव म्हणाले आहेत की, देशात भाजपचा सामना फक्त ममता बॅनर्जीच करू शकतात. एसआयआरच्या नावाखाली उत्तर प्रदेशात एनआरसी लागू करण्याचं आणि लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. लोकशाही वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्या लढाईत समाजवादी पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे अखिलेश यादव यांनी आश्वासन दिले.

अखिलेश यादव यांनी यावेळी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आईपॅक कार्यालयावर अलिकडेच ईडीने टाकलेल्या छाप्याबद्दलही भाष्य केलं. या महिन्याच्या ८ तारखेला ईडीने आईपॅकचे संचालक प्रतीक जैन यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापा टाकला. या झडतीदरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होत्या आणि त्यांच्या उपस्थितीत अनेक फायली आणि कागदपत्रे बाहेर काढण्यात आल्याचा आरोप आहे. ममता बॅनर्जी येथून एक पेन ड्राइव्ह घेतल्याचंही बोललं जातं. या घटनेचा दाखला देत अखिलेश यादव यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यावरूनच भाजपची खिल्ली उडवत ते म्हणाले की, “भाजप अजूनही त्या पेन ड्राइव्हचे दुःख विसरलेली नाही.”