हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनमध्ये मुक्त व्यापार करार, जाणून घ्या सविस्तर माहिती

मंगळवारी हिंदुस्थान आणि युरोपियन युनियन (EU) यांच्यात मंगळवारी मुक्त व्यापार करार (FTA) झाला. हिंदुस्थान आणि युरोपियन युनियनच्या नेत्यांनी मंगळवारी १६ व्या हिंदुस्थान -ईयू शिखर परिषदेदरम्यान याची घोषणा केली. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, हा करार २०२७ मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. या करारानंतर, हिंदुस्थानात बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज सारख्या युरोपियन कारवरील कर ११० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी होईल.

याव्यतिरिक्त हिंदुस्थानातात युरोपियन मद्य आणि वाइन आयातीवरील कर कमी केला जाऊ शकतो. सध्या युरोपियन मद्यावर १५० टक्के कर आकारला जातो. तो २०-३० टक्क्यांपर्यंत कमी केला जाऊ शकतो.

या कराराची माहिती देताना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, “कोणताही करार तेव्हाच होतो जेव्हा दोन्ही पक्षांना फायदे दिसतात.” ते म्हणाले की, हा करार दोन्ही बाजूंच्या हिताचे काम करतो आणि दोघांनाही यातून फायदा होईल, म्हणूनच आज हा करार करण्यात आला आहे.”