
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याने बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यावर शाई फेकण्यात आली. सातव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारानिमित्त सुपे येथे आले होते. या ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा झाल्यानंतर निघाले असता, त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकल्याची चर्चा होती.





























































