
चावी वाटप सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून वेळ मिळत नसल्यामुळे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सुमारे 864 रहिवाशी नव्या घराचा ताबा कधी मिळणार याकडे डोळे लावून बसले आहेत.
नायगाव बीडीडी येथील पुनर्वसन इमारत क्र. 8 मधील टॉवर क्र. 4 ते 8 या पाच इमारतींचे काम पूर्ण झाले असून 864 रहिवाशांना दिवाळीत घरे देण्याचे म्हाडाचे नियोजन होते.
भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे दिवाळीचा मुहूर्त हुकला. काही कारणात्सव नोव्हेंबरची तारीख पुढे ढकलली. त्यानंतर आचारसंहिता लागल्यामुळे चावी वाटपाचा कार्यक्रम रखडला होता. आता आचारसंहिता संपूनही चावी वाटपासाठी नवी तारीख मिळालेली नाही.
Naigaon BDD Chawl Residents Wait for New Homes as CM’s Schedule Delays Keys
864 residents of Naigaon BDD Chawl are waiting for their new homes. The key distribution ceremony is stuck due to the Chief Minister’s unavailability despite completed towers.




























































