
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण सोशल मीडिया जणू स्तब्ध झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ‘एक्स’ आणि व्हॉट्सॲपवर केवळ अजित पवारांच्या आठवणी आणि त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीचा पूर आला आहे. राजकीय मतभेद विसरून सामान्य जनतेपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत प्रत्येकाने आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.
स्टेटस आणि स्टोरीमधून ‘अश्रूंची’ श्रद्धांजली
राज्यातील लाखो तरुणांनी आपल्या व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम स्टोरीवर अजित दादांचे फोटो शेअर करत ‘काळाचा घाला’ अशा शब्दांत आपले दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पहाटेच्या कामाचा धडाका, रोखठोक बोलणे आणि प्रशासनावरील पकड या आठवणींना उजाळा देणारे शेकडो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अनेकांनी आपल्या डीपी (Profile Picture) ऐवजी काळी पट्टी किंवा दादांचा फोटो ठेवून शोक व्यक्त केला आहे.
मृत्यूच्या ४८ मिनिटांपूर्वीचे ‘ते’ शेवटचे ट्विट
अजित पवार यांचे शेवटचे सोशल मीडिया पोस्ट देखील सर्वत्र मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. अपघाताच्या अवघ्या काही मिनिटे आधी, सकाळी ८:५७ वाजता त्यांनी ‘पंजाब केसरी’ लाला लजपत राय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट केले होते. ‘आयुष्याचा भरवसा नाही, ४८ मिनिटांपूर्वी अभिवादन करणारे दादा आता आपल्यात नाहीत’, अशा भावूक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत.
सेलिब्रिटी आणि सामान्यांचा ‘डिजिटल’ शोक
रितेश देशमुख, अजय देवगण आणि सुबोध भावे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांनीही पोस्ट शेअर करत ‘महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान’ अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. ‘अजित दादा’ हे नाव आज सोशल मीडियावर टॉप ट्रेंडमध्ये असून, ‘प्रशासनाचा वाघ हरपला’ अशा भावना सामान्य नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
Social Media Flooded with Tributes for Ajit Pawar After Baramati Plane Crash
Maharashtra mourns the loss of Ajit Pawar. Social media platforms like WhatsApp, Instagram, and X are filled with emotional tributes and statuses for the late Deputy CM.


























































