
जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीत जाण्यासाठी निघालेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झालं. या अपघातात अजित पवारांसह विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला. वयाच्या ६६ व्या वर्षी अजित पवार यांनी जगाचा निरोप घेतला. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाशी संबंधित एक विचित्र योगागोग समोर आला आहे. या घटनेचा ६ अंकाशी संबंध असून हा विचित्र योगायोग असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
अजित पवार यांचं वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झालं असून निधनावेळी त्यांचं वय ६६ वर्षे, ६ महिने आणि ६ दिवस इतके होते. तसेच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दत तब्बल ६ वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यांच्या आयुष्यातील ‘६’ या अंकाच्या विचित्र योगायोगाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.



























































