
मतदार यादी फेरतपासणीच्या (एसआयआर) कायदेशीर वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. बिहारमध्ये एसआयआर घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात त्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
























































