रत्नागिरी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक, शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीने उमेदवारांना बळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षांसोबत वंचित बहुजन आघाडीची साथ लाभली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे रत्नागिरी जिल्हा परिषद आणि पंचायतीवर भगवा फडकणारा हे निश्चित झाले आहे.

रत्नागिरी जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीने युती केल्यामुळे उमेदवारांना एक ताकद मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कांबळे, निवेंडीचे प्रकाश डिंगणकर, ओरीचे विजय जाधव, खरवतेचे प्रकाश मोगरे, धामणसेचे निमेश जाधव, जांभरूणचे दीपक सावंत, वेतोशीचे विनोद करंबेळे घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. हातखंबा जिल्हा परिषद गटात वंचित बहुजन आघाडीचे मुकुंद सावंत आणि पंचायत समिती गणात शिवसेनेच्या श्रृती जोंजाळ एकत्र प्रचार करत आहेत.