पॉश सोसायटीतील तीन बहिणींनी मृत्यूला का कवटाळलं? काय आहे Korean Love Game? वाचा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये पॉश सोसायटीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी ऑनलाईन गेमच्या व्यसनावरून पालकांनी रागावल्यामुळे इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवले. कोविडमध्ये लॉकडाऊन दरम्यान या मुलींना ऑनलाईन गेमचे व्यसन लागले. त्या तिघी टास्कवर आधारित एका कोरियन ऑनलाईन गेमच्या आहारी गेल्या होत्या.

काय आहे हा कोरियन लव्ह गेम?

हा गेम मनोरंजनासाठी बनवलेला साधा गेम नाही आहे. हा एक चॅट-आधारित गेम आहे. ज्यामध्ये समोरची व्यक्ती कोरियन मुलगा किंवा मुलगी म्हणून स्वतःला सादर करून या गेमची सुरुवात करते. हा गेम कोरियन संस्कृती, के-पॉप आणि के-ड्रामाच्या यांच्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेतो. हळूहळू, हे चॅट प्रेमात बदलते, ज्यामध्ये खेळाडूला काल्पनिक जोडीदारावरील प्रेम सिद्ध करण्यासाठी काही विशिष्ट टास्क पूर्ण करावे लागतात. हा काल्पनिक जोडीदार त्यांच्याशी कोरियन भाषेत गोड बोलतो, रोमँटिक मॅसेज पाठवतो आणि दररोज नवीन टास्क संबंधित व्यक्तीला करायला सांगतो. सुरुवातीला हे टास्क अगदी सोपे वाटू लागतात. मात्र, काही काळानंतर हा गेम कठीण वळण घेतो. पुढे हा गेम खेळता खेळता युजरला नुकसानकारक टास्क करण्यास सांगतो आणि शेवटी मरणाच्या दारात पोहोचवतो.

हा गेम कोणत्याही अॅप स्टोअरवर उपलब्ध नाही, तरीही लोक तो डाउनलोड करून खेळत आहेत. हा गेम मोबाईल फोनवर ऑनलाइन खेळला जातो. तो विविध वेबसाइट्स आणि लपलेल्या लिंक्सद्वारे इंटरनेटवर पसरला आहे. टेलिग्राम आणि व्हॉट्सअॅप ग्रुप्सद्वारेही हा गेम प्रसारित केला जात असल्याचे मानले जात आहे.