Photo चाफा आणि तो… प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा गोरेचं लग्न ठरलं, या अभिनेत्यासोबतचे फोटो केले शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘स्टार प्रवाह’वर सुपरहिट ठरलेल्या ‘आई कुठे काय करते’  या मालिकेतून घराघरात पोहोचलेली मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिचे लग्न ठरले आहे. अपूर्वाने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. या फोटोंसोबत तिने ‘चाफा आणि तो…. मला खुप आवडतात…’ अशी कॅप्शनही शेअर केली आहे.

अपूर्वाचा होणारा नवरा हा देखील अभिनेता असून त्याने २०१२ साली आलेल्या ‘शाळा’ सिनेमात मुख्य भूमिका साकारली होती. अंशुमन जोशी असे त्याचे नाव असून केतकी माटेगावकरसोबत तो या चित्रपटात झळकला होता. अंशुमनने इंस्टाग्रामवर त्याची ओळख अभिनेता, दिग्दर्शक, लेखक, चिंतक, चित्रलेखक, छायाचित्रकार अशी करून दिली आहे.