
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा जिल्हापरिषद गटात मतांसाठी पैसे वाटले जात आहेत.तसेच मतदानाकरिता मतदारांना धमकावले जात असल्याची तक्रार माजी समाजकल्याण सभापती आणि हातखंबा गटातील अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.
हातखंबा गटात अटीतटीची लढत सुरू असताना अपक्ष उमेदवार परशुराम कदम यांनी केलेल्या आरोपानुळे खळबळ माजली असून निवडणूक आयोग आता पैसे वाटणाऱ्यांचा कसा बंदोबस्त करणार याकडे लक्ष लागले आहे. परशुराम कदम यांनी केलेल्या तक्रारीत हातखंबा गटात मोठ्या प्रमाणात मतांसाठी पैसे वाटप केले जात आहे.तसेच मतदारांना धमकावले जात असून हा लोकशाही पद्धतीला तडा जात आहे.या गैरप्रकाराला तात्काळ आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्यात यावी व मतदारांना सुरक्षित वातावरणात मतदान करता यावे अशी मागणी परशुराम कदम यांनी केली आहे.
































































